यशवंतराव घोरपडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST2020-12-24T04:20:46+5:302020-12-24T04:20:46+5:30

यशवंतराव घोरपडे यांचे निधन हलकर्णी : संकेश्वर येथील सेवानिवृत्त शिक्षक यशवंतराव अनंतराव घोरपडे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

Yashwantrao Ghorpade passed away | यशवंतराव घोरपडे यांचे निधन

यशवंतराव घोरपडे यांचे निधन

यशवंतराव घोरपडे यांचे निधन

हलकर्णी : संकेश्वर येथील सेवानिवृत्त शिक्षक यशवंतराव अनंतराव घोरपडे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन, गुरुवारी (दि. २४) सकाळी आहे. गणित व इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आणि ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते परिचीत होते. हुक्केरी तालुक्यातील सोलापूर येथे माध्यमिक शाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वी त्यांनी फलटणला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात आणि बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अकौंटंट, तर धारवाडला अबकारी खात्यात एक्स्टेंशन ऑफिसर म्हणूनही सेवा केली. दि डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी पुणे व कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेंगलोर या संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

------------------------

* यशवंतराव घोरपडे : २२१२२०२०-गड-०४

Web Title: Yashwantrao Ghorpade passed away