यड्राव ग्रामपंचायतीस रत्नाप्पाण्णांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:56+5:302021-09-17T04:28:56+5:30

शिरोळ तालुक्याचे सहा वेळा आमदार झालेले व मंत्रिपद भूषविलेले रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आमदारकीच्या वेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून गावाचा ...

Yadrao Gram Panchayat forgets Ratnappanna | यड्राव ग्रामपंचायतीस रत्नाप्पाण्णांचा विसर

यड्राव ग्रामपंचायतीस रत्नाप्पाण्णांचा विसर

शिरोळ तालुक्याचे सहा वेळा आमदार झालेले व मंत्रिपद भूषविलेले रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आमदारकीच्या वेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. जिल्हा सुतगिरणी, पार्वती औद्योगिक वसाहत व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

सहकारी संस्था अथवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या यड्राव गावातून करण्याचा त्यांचा प्रघात होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी गटाकडून प्रचार पत्रकावर रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यासह इतर नेत्यांच्या प्रतिमा छापून त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.

परंतु ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीदिनी सत्ताधारी गटाकडून प्रतिमा पूजन करण्यात आले नाही. गावच्या विकासासाठी सर्व दृष्टीने पाठबळ देणाऱ्या लोकनेत्याचे प्रतिमा पूजन करण्याचा विसर पडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Yadrao Gram Panchayat forgets Ratnappanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.