ए. वाय. पाटील यांच्या आशीर्वादानेच आम्ही घरी !

By Admin | Updated: December 31, 2014 00:41 IST2014-12-31T00:41:11+5:302014-12-31T00:41:26+5:30

पी. एन. पाटील यांची फटकेबाजी : विधानसभेनंतर प्रथमच एकत्र

A. Y We are home with the blessings of Patil! | ए. वाय. पाटील यांच्या आशीर्वादानेच आम्ही घरी !

ए. वाय. पाटील यांच्या आशीर्वादानेच आम्ही घरी !

कोल्हापूर : ए. वाय. पाटील यांच्या आशीर्वादानेच तुम्ही आणि मी घरी बसल्याचे सांगत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर फटकेबाजी केली. आता दोघेही ‘माजी आमदार’ असल्याने आर. सी. पाटील यांच्यासाठी सरकारदरबारी आपली ताकद काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बेले (ता. करवीर) येथील कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर ए. वाय. पाटील यांनी स्तुतिसुमने उधळली आणि तेथूनच ‘पी. एन.-के. पी’ संघर्ष सुरू झाला. विधानसभा निवडणुकीपर्यंत या संघर्षाला चांगलीच धार आली आणि करवीर व राधानगरी तालुक्यातील राजकारणच बदलून गेले. राज्यात शिवसेना, भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादीत सरळ सामना होत असताना, या दोन मतदारसंघांत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार निवडून आणले. निवडणुकीनंतर तरी या दोन नेत्यांतील वाद संपेल, अशी अपेक्षा होती, पण के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात आणि त्यानंतर हळदी येथील बक्षीस वितरण कार्यक्रमात काँग्रेसच्या जिल्ह्णातील नेत्यांवर सडकून टीका केली. त्याला त्याच भाषेत पी. एन. पाटील यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बोलती बंद केली होती. एवढ्या संघर्षानंतर आर. सी. पाटील यांच्या कार्यक्रमात हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने करवीर, राधानगरी तालुक्यांतील दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. हा कार्यक्रम एखाद्या नेत्याने टाळला असता पण आर. सी. पाटील यांचे सर्वच नेत्यांशी घरचे संबंध असल्याने टाळणे अशक्य नव्हते अन् अखेर नेते एकत्र आले. सुरुवातीला थोडा वेळ दोन्ही नेत्यांनी अबोला धरला, त्यानंतर हळूहळू पी. एन. पाटील व के. पी. पाटील यांच्यात चर्चा सुरू झाली.
या व्यासपीठावर राजकीय भाष्य होणार नाही, अशी अटकळ सर्वांचीच होती, पण ए. वाय. पाटील यांनी भाषणाच्या शेवटी-शेवटी पी. एन. पाटील यांच्या ६ जानेवारीच्या वाढदिवसाचा उल्लेख करत, आमच्यावर प्रेम करणारे, आमच्या पाठीशी आशीर्वाद असणारे पी. एन. साहेबांना आगाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे सांगत डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्या नेहमीच्या शैलीत पी. एन. पाटील यांचा आमचे ज्येष्ठ बंधू असा उल्लेख करत आर. सी. पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले जातील, पण पी. एन.साहेब तुम्ही आम्ही रिटायर माणसे असल्याचा टोला के. पी. पाटील यांनी हाणला.
हाच धागा पकडत, ‘आर. सी.’यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण के. पी. साहेब ए. वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने आपण दोघेही घरी बसल्याचा टीका पी. एन. पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)


हे हास्य निवडणुकीआधी असते तर..:
राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात मंगळवारी पी. एन. पाटील, के. पी. पाटील व ए. वाय. पाटील एकत्र आले. यावेळी त्यांच्यात सुरुवातीला अबोला राहिला; पण नंतर हे नेते हास्यात रमले.

Web Title: A. Y We are home with the blessings of Patil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.