शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागात मुलींची आघाडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 11:38 IST

बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबारावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागात मुलींची आघाडी कायमनिकालात वाढ; विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वल

कोल्हापूर : बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. विभागामध्ये २७.४३ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला.बारावीच्या निकालाबाबतची कोल्हापूर विभागाची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सचिव मोळे म्हणाले, या फेरीपरीक्षेअंतर्गत लेखी परीक्षा दि. १७ जुलै ते ४ आॅगस्टदरम्यान, तर दि. ९ जुलै ते १६ जुलै या कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा झाली.

या फेरपरीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून ८१२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ८१०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २१०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी २५.९४ आहे. या परीक्षेत मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २४.०४ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.२७ आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्क्यांनी जादा आहे. या परीक्षेच्या विभागातील शाखानिहाय निकालामध्ये ३३.८५ टक्क्यांसह विज्ञान शाखा पुढे आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य (२९.०७ टक्के), व्यावसायिक (२५.३९) आणि कला (२३.८२) या शाखा आहेत. यावर्षी विभागात कॉपीचा एक प्रकार घडला. त्याबाबत मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली.

या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रत या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपत्रिका वाटपाची तारीख मंडळातर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, सांगलीच्या शिक्षणविस्तार अधिकारी एस. एस. बस्तवडे, साताऱ्याचे शिक्षणविस्तार अधिकारी साईनाथ वालेकर उपस्थित होते.

जिल्हा निकाल असा

  1. कोल्हापूर : २७.४३ टक्के
  2. सांगली : २६.६२ टक्के
  3. सातारा : २३.४९ टक्के

 

विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

  1.  कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल : २५.९४ टक्के
  2. निकालातील या वर्षीची वाढ : ०.७८ टक्के
  3. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : २१०३
  4. उत्तीर्ण मुलांची संख्या : १६४६
  5.  उत्तीर्ण मुलींची संख्या ४५७

 

विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे

  1. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीच्या मागणी मुदत : दि. २७ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर
  2. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत : दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर

 

 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८kolhapurकोल्हापूर