कुटकोळी येथे कुस्ती मैदान

By Admin | Updated: June 26, 2015 00:32 IST2015-06-26T00:32:51+5:302015-06-26T00:32:51+5:30

या मैदानात ‘प्रकाशबापू किताबा’साठी गंगावेस तालीम, कोल्हापूरचा अण्णा कोळेकर विरुद्ध मोतीबाग तालीमचा अमोल फडतरे यांच्यात लढत

Wrestling field at Cottcoli | कुटकोळी येथे कुस्ती मैदान

कुटकोळी येथे कुस्ती मैदान

कवठेमहांकाळ : प्रकाशबापू पाटील यांची जयंती तसेच चंद्रसेनदादा पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुटकोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी (दि. २८) दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. या मैदानात ‘प्रकाशबापू किताबा’साठी गंगावेस तालीम, कोल्हापूरचा अण्णा कोळेकर विरुद्ध मोतीबाग तालीमचा अमोल फडतरे यांच्यात लढत होणार आहे, तर ‘चंद्रसेनदादा पवार किताबा’साठी शरद साखर कारखान्याचा अभिजित भंडारे विरुद्ध दिल्लीचा सत्येंद्रसिंह रजपूत यांच्यात लढत होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे यांनी दिली. कुस्ती मैदानासाठी अध्यक्ष म्हणून सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रकाश आवाडे, सुरेश पाटील, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजय सगरे, गजानन कोठावळे, अजित कारंडे उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Wrestling field at Cottcoli