जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत योद्धा मंडळास विजेतेपद
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:01:36+5:302014-11-29T00:30:48+5:30
वेगवान खेळ करीत विजेतेपद पटकाविले

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत योद्धा मंडळास विजेतेपद
सांगली : वाळवा येथे झालेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मंगरूळ (ता. खानापूर) येथील योद्धा मंडळाने वेगवान खेळ करीत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात योद्धा मंडळाने नागठाणेच्या नेताजी मंडळाचा एक डाव एक गुणाने पराभव करून विजय मिळविला. विजेत्या योद्धा मंडळातील यशस्वी खेळाडू असे : ज्योती शिंदे (कर्णधार), मोनाली शिंदे, कोमल शिंदे, संगीता कोरे, सारिका शिंदे, वैष्णवी जंगम, अंकिता शिंदे. यापैकी ज्योती, कोमल, संगीता व मोनालीची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीत शिकत आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक सम्राट शिंदे, यशवंत चव्हाण, अभिजित शिंदे, दीपक चव्हाण, संतोष मोहिते, सुजित शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)