कुस्तीपटू नंदिनीला सव्वातीन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:08 IST2017-08-03T00:08:54+5:302017-08-03T00:08:54+5:30

Wrestler Nandini Sawantin Lakhans Help | कुस्तीपटू नंदिनीला सव्वातीन लाखांची मदत

कुस्तीपटू नंदिनीला सव्वातीन लाखांची मदत


लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी मुरगूड येथील निवड झालेल्या नंदिनी साळोखे हिला जय शिवराय एज्युकेशन संस्थेकडून सव्वातीन लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे फिनलँडला जाण्याचा तिचा मार्ग सुकर झाला आहे. मुरगूड येथे हमीदवाडा कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते नंदिनीची आई सरिता साळोखे यांच्याकडे निधी सुपूर्द केला.
संस्था कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य ए. डी. कुंभार, प्राचार्य महादेव कानकेकर, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगराध्यक्ष व वस्ताद सुखदेव येरुडकर, प्रशिक्षक दादासो लवटे, पांडुरंग भाट, सुनील मंडलिक, मुख्याध्यापिका संजीवनी भारमल, प्रकाश माने, विष्णुपंत मोरबाळे, अशोक अर्जुने, आदी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Wrestler Nandini Sawantin Lakhans Help