भावांच्या मारहाणीत जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST2021-02-23T04:35:42+5:302021-02-23T04:35:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून सख्ख्या भावांसह नातेवाईकांनी एका युवकास बेदम मारहाण करण्याची घटना भोर तालीमजवळ घडली. ...

Wounded in brother's beating | भावांच्या मारहाणीत जखमी

भावांच्या मारहाणीत जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून सख्ख्या भावांसह नातेवाईकांनी एका युवकास बेदम मारहाण करण्याची घटना भोर तालीमजवळ घडली. या मारहाणीत केदार भागोजी घुरके (वय २५, रा. प्रिन्स राजाराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) हा जखमी झाला. भाऊ केतन घुरके, मामेभाऊ विजय राजू देवणे, मामा राजू भिकाजी देवणे (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) यांनी लाथा-बुक्क्यानी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद झाली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शेतकऱ्यास दुचाकीची धडक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील तुकाराम गणपती पाटील (वय ४८) हे शेतातून डोक्यावरून वैरण घेऊन घरी जात होते, यावेळी अज्ञात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना आंबेवाडी ते प्रयाग चिखलीदरम्यान म्हसोबा देवालयानजीक घडली. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Wounded in brother's beating