पूजा प्रियदर्शनी यांची जडणघडण दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:16 IST2019-04-06T00:16:00+5:302019-04-06T00:16:07+5:30

कोल्हापूर : पूजा प्रियदर्शनी यांनी यूपीएससी अंतिम परीक्षेत देशात अकरावा क्रमांक पटकावीत शुक्रवारी बाजी मारली. त्यांनी इंडियन फॉरिन सर्व्हिससाठी ...

Worship of Priyadarshini in Delhi | पूजा प्रियदर्शनी यांची जडणघडण दिल्लीत

पूजा प्रियदर्शनी यांची जडणघडण दिल्लीत

कोल्हापूर : पूजा प्रियदर्शनी यांनी यूपीएससी अंतिम परीक्षेत देशात अकरावा क्रमांक पटकावीत शुक्रवारी बाजी मारली. त्यांनी इंडियन फॉरिन सर्व्हिससाठी (आयएफएस) परीक्षा दिली होती. निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आणि दिल्लीतील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त साधना शंकर यांच्या त्या कन्या आहेत. पूजा यांची जडणघडण दिल्लीमध्ये झाली आहे. ज्ञानेश्वर मुळे यांचे मूळ गाव अब्दुललाट (जि. कोल्हापूर) हे आहे. पूजा यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. सध्या रिलायन्स फौंडेशनमध्ये टीम लीडर आहेत.
असाही योगायोग
पूजा यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याच्या सायंकाळीच त्यांना या परीक्षेतील यशाची भेट मिळाली. वडिलांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयातून निवृत्त होऊन अडीच महिने पूर्ण होण्याआधीच परराष्ट्र सेवा विभागाच्या परीक्षेत पूजा यांनी यश मिळविले आहे.

Web Title: Worship of Priyadarshini in Delhi