शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Navratri2022: सिद्धीदात्री देवीच्या रूपात अंबाबाईची पूजा -video

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 28, 2022 18:46 IST

दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी हा नववा अवतार

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला आज, बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सिद्धीदात्री देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी हा नववा अवतार आहे. देव, मानव आणि दानवांनाही सिद्धी प्रदान करणारी देवी, असा या देवतेचा लौकिक आहे.नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या स्त्री देवतेच्या रूपात पूजा बांधली जाते. यंदाच्या सर्व पूजा दुर्गेच्या विविध रूपातील असून सिद्धीदात्री हे नववे रूप आहे. सिद्धी म्हणजे असामान्य क्षमता. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व व वशित्व या आठ सिद्धी आहेत. म्हणजेच शरीराला अति सूक्ष्म, अतिविशाल, अदृश्य होण्याची, ईश्वर स्वरूप मिळणारी, एखाद्याला आपला दास करणारी शक्ती.देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धीदात्रीच्या कृपेनेच सिद्धी मिळवल्या, तसेच तिच्या अनुकंपेने त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले, त्यामुळे शंकराला अर्धनारीश्वर म्हटले जाते. श्री सिद्धीदात्री ही कमलासनावर विराजमान असून चर्तुभुज आहे. तिने शंख, चक्र, गदा व कमळ धारण केले आहे. ही पूजा पुजारी अनिल कुलकर्णी, नारायण कुलकर्णी, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर