शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: ललिता पंचमीला अंबाबाई देवीची हत्तीवरील पूजा, अंबाबाई-त्र्यंबोलीची झाली भेट

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 8, 2024 17:49 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा बांधण्यात आली. या अंबारीत बसून ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा बांधण्यात आली. या अंबारीत बसून अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला निघाला असा या पूजेचा अर्थ आहे.कोल्हासूर वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव दिले जाईल. पुढे कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने कपिलमुनींकडून योगदंड मिळवून अंबाबाईसह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये केले. त्यातून फक्त त्र्यंबोली देवी वाचली होती. ही गोष्ट कळताच त्र्यंबोली देवीने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचेच रूपांतर बकऱ्यांमध्ये केले व अंबाबाईसह सर्व देवांची मुक्तता केली.अंबाबाईच्या विजयोत्सवात देव त्र्यंबोलीला बोलवायचे विसरले त्यामुळे त्र्यंबोली रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर येऊन अंबाबाईकडे पाठ करून बसली, ही चुक लक्षात येताच अंबाबाई स्वत: देवांसह तिच्या भेटीला आली आणि तिने तिला वरदान दिले की आज पासून तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्या वाचून पुण्य कर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल. याखेरीज जो कुष्मांडभेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो तो यापुढे तुझ्यासमोर होईल मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन. त्यामुळे ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाई त्र्यंबोली भेटीसाठी जाते. या कथेला अनुसरून ललिता पंचमीला पूजा बांधली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर