शरद साखर कारखान्यात मिलरोलरचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:25+5:302021-07-14T04:28:25+5:30
आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या नेतृत्वाखाली आगामी गळीत हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी ...

शरद साखर कारखान्यात मिलरोलरचे पूजन
आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या नेतृत्वाखाली आगामी गळीत हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी हंगामपूर्व तयारी जोमाने सुरू आहे. उत्तम नियोजन करून गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला जाईल. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी वाहतूक यांची बिले वेळेवर अदा केली असून, आगामी हंगामातही सर्वांना बरोबर घेऊन जास्ती जास्त उसाचे गाळप केले जाईल, अशी ग्वाही संजय पाटील (यड्रावकर) यांनी दिली.
कार्यक्रमास युवा नेते आदित्य पाटील (यड्रावकर), उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक डी. बी. पिष्टे, अप्पासाहेब चौगुले, रावसाहेब भिलवडे, सुभाषसिंग रजपूत, गुंडा इरकर, अजित उपाध्ये, संजय नांदणे, रावसाहेब चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, चीफ अकौंटंट सी. बी. बिरनाळे, डेप्युटी चीफ अकौंटंट आर. बी. पाटील, चीफ इंजिनिअर शिवाजी पाटील, वर्क्स मॅनेजर नानासाो जाधव, चीफ केमिस्ट संजय साळवे, शेती अधिकारी दीपक पाटील, एस. एस. वावरे, परचेस ऑफिसर बी. एम. बेलेकर, लेबर ऑफिसर अमोल मगदूम आदी उपस्थित होते.
फोटो :
ओळी- नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यात मिलरोलरचे पूजन उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी थबा कांबळे, आदित्य पाटील (यड्रावकर), सुभाषसिंग रजपूत, आप्पासाहेब चौगुले, संजय नांदणे, लक्ष्मण चौगुले, रावसाहेब भिलवडे, डी. बी. पिष्टे, गुंडा इरकर आदी उपस्थित होते. (छाया - अनंतसिंग फोटो).