शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २० भाषेत १५०० गायकांचे संविधान महागायन, कोल्हापुरात केला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:14 IST

विशेषतः मूकबधिर विद्यार्थी-कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली

कोल्हापूर : येथील दसरा चौकाने रविवारी रात्री एक वेगळाच माहोल अनुभवला. तब्बल १५०० गायकांनी २० भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील प्रास्ताविकेचे महागायन केले आणि दसरा चौक एका विश्वविक्रमाचा साक्षीदार ठरला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून , 'हम भारत के लोग' अर्थात संविधान गीताचा महा विश्वविक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी देशातील विविध भागांतून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, मैथिली, राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी यासारख्या वीस भाषांतील संविधान प्रास्तविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले. विशेषतः मूकबधिर विद्यार्थी - कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली. यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून याबाबतचे प्रशस्तिपत्र या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकनवरे यांना रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.रामदास आठवले म्हणाले, व्यक्तीने जिंदादिली जपत असताना तो कलासक्त असणे गरजेचे आहे. भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे आहे . संविधानाच्या प्रास्ताविकेचे विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, प्रा. आनंद भोजने, सतीश माळगे, उत्तम कांबळे , शहाजी कांबळे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.