बांधकाम कामगारांच्या मुलांचे 'कल्याण
By Admin | Updated: January 21, 2015 23:57 IST2015-01-21T23:33:43+5:302015-01-21T23:57:45+5:30
ंमोफत पुस्तक संच : जिल्ह्यातील १३ हजार कामगारांच्या मुलांना मिळणार फायदा'

बांधकाम कामगारांच्या मुलांचे 'कल्याण
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेल्या कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, नवीन तंत्रज्ञान यांच्यासह इतर गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी विविध विषयांवरील पुस्तकांचा संच मोफत देण्यात येणार असल्याने बांधकाम कामगारांची मुलेही ‘हायटेक’ झाली आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १३ हजार बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार आहे.
कामगारांच्या पाल्यांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी, त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडावी, दर्जेदार शिक्षण मिळावे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये ही मुले मागे राहू नयेत, या उद्देशाने त्यांना या विविध पुस्तकांचा संच मोफत दिला जाणार आहे. मुलांच्या दैनंदिन पाठपुस्तकांतील अभ्यासक्रमासह अन्य विषयांची माहिती होण्यासाठी तसेच त्यांना सर्वांगीण ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरणार आहे. कामगारांच्या पाल्यांना प्रत्येकी एक हजारपर्यंतच्या किमतीच्या पुस्तकांचे संच मोफत मिळणार आहेत. कोल्हापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये मुळातच कर्मचारी कमी आहेत. तरीही त्यांनी आहेत त्या कर्मचाऱ्यांमार्फत नियोजबद्धरीत्या या पुस्तकांचे वाटप सुरू केले आहे.