आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
By Admin | Updated: June 24, 2015 00:53 IST2015-06-23T23:27:20+5:302015-06-24T00:53:29+5:30
चंद्रकांत पाटील : भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
इचलकरंजी : आगामी काळामध्ये होणाऱ्याा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसह अन्य निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्व निवडणुका पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करून नियोजनबद्धरीत्या लढवाव्यात, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्या प्रमुख भाषणात मंत्री पाटील बोलत होते. निवडणुकांमध्ये सर्व ताकदीनिशी उतारण्याकरिता कार्यकर्त्यांना भाजप बळ देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय स्तरावर झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.
मेळाव्यासाठी आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, अनिल डाळ्या, नाथाजी पाटील, अलकेश कानडकर, विश्वनाथ हंचनाळे, के. एस. चौगुले, विठ्ठल पाटील, वैशाली नायकवडे, सारीका भोकरे, अंजना शिंदे, रागिणी शर्मा, राजेंद्र देशमुख, तमन्ना कोटगी, आदी प्रमुखांसह इचलकरंजी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)