मुरुम अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST2021-09-02T04:51:34+5:302021-09-02T04:51:34+5:30

कोल्हापूर : शाहुपुरी व्यापारी पेठ परिसरात भिंतीवरील मुरुम अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...

A worker dies after falling on a pimple | मुरुम अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

मुरुम अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : शाहुपुरी व्यापारी पेठ परिसरात भिंतीवरील मुरुम अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. कृष्णा हणमंत यारझारवी (वय ३६, रा. रमनमळा, कोल्हापूर. मूळ गाव हळकुंद, ता. बेळगाव, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोकुळ हॉटेलच्या पिछाडीस व्यापारी पेठ परिसरात एका ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मंगळवारी सकाळी कृष्णा यारझारवी हा कामगार मुरुम बुट्टीत भरून इतरत्र ठिकाणी टाकण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी अचानक भिंतीवरील मुरुम कोसळून तो अंगावर पडल्याने त्यामध्ये कृष्णा हा कामगार गंभीर जखमी झाला. त्यामध्ये ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: A worker dies after falling on a pimple