‘उमेद’कडून गरिबांना मायेची ऊब देण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:01+5:302021-02-05T07:06:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : उमेद फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीमुळे राज्यातील दिनदलित, भटक्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम ...

The work of ‘Umed’ to give warmth to the poor | ‘उमेद’कडून गरिबांना मायेची ऊब देण्याचे काम

‘उमेद’कडून गरिबांना मायेची ऊब देण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : उमेद फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीमुळे राज्यातील दिनदलित, भटक्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम झाले आहे. या कार्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने आता स्वतःची इमारत होणार असल्याने होणार आहे. शिक्षक आमदार म्हणून मी सहकार्य करणारच आहे पण देणगीदारांनी अशा सत्कार्याला हात लावावा, असे आवाहन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.

आज कोपार्डे (ता. करवीर) येथे आमदार आसगावकर यांच्या हस्ते उमेद फाऊंडेशनच्या ‘मायेची सावली’ इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी आसगावकर म्हणाले, राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी आहे. यात भटक्या जमाती, ऊसतोड मजूर, शेतमजूर यांच्या मुलांची संख्या जास्त आहे. या मुलांना शिक्षण, जेवण व राहण्याची सोय करून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे अवघड काम उमेद फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. अशा समाजाभिमुख काम करणाऱ्या संस्थेने मदत केली तर ती योग्य आणि गरजू मुलांपर्यंत पोहोचेल आणि शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. आपण व्यक्तिगत तसेच शासनाच्या माध्यमातून आणि सेवाभावी संस्थांना उमेद फाऊंडेशनच्या कार्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आसगावकर यांनी सांगितले.

यावेळी उमेद फाऊंडेशनचे प्रकाश गाथाडे यांनी समाजातील गरीब मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प हाती घेतला आहे. अधिकाधिक मुले या ‘मायेच्या सावली’त येऊन आपले भवितव्य घडवतील, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अनू आसगावकर, अनिल नानिवडेकर, पारस ओसवाल, अशोक रोकडे, किशोर देशपांडे (सावली केअर), प्रकाश पाटील, राजू दिवसे, सांगरुळचे सरपंच सदाशिव खाडे उपस्थित होते.

--------------------- ----------------------

(फोटो) कोपार्डे (ता. करवीर) येथे उमेद फाऊंडेशनच्या ‘मायेची सावली’ या केअर सेंटर इमारतीचे उद्घाटन आमदार प्रा. जयंत आसगावकर, अनू आसगावकर, सरपंच सदाशिव खाडे आदींच्या उपस्थितीत झाले.

Web Title: The work of ‘Umed’ to give warmth to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.