उचगाव ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST2021-08-17T04:29:49+5:302021-08-17T04:29:49+5:30
: कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीचे कोरोनाच्या संकटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या पाठीवर ...

उचगाव ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय
: कर्मचाऱ्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीचे कोरोनाच्या संकटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचे कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
उचगाव येथील विविध संस्था, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच मालूताई काळे होत्या.
यावेळी माजी सरपंच पै. मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, प्रदीप बागडी, दिनकर पोवार, जयश्री रेडेकर, संगीता दळवी, स्वाती जाधव, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, विनायक जाधव, दीपक रेडेकर, कीर्ती मसुटे उपस्थित होते.
फोटो : १७ उचगाव सत्कार
उचगाव ग्रामपंचायतीतर्फे कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, लोकनियुक्त सरपंच मालूताई काळे, गणेश काळे, राजू यादव, सुनील पोवार उपस्थित होते.