सर्जिकल सोसायटीचे कार्य देशपातळीवर प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:22+5:302021-02-14T04:23:22+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर सर्जिकल सोसायटी या संघटनेने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केले आहे. हे कार्य देशपातळीवरील नवोदित शल्य विशारदांना ...

सर्जिकल सोसायटीचे कार्य देशपातळीवर प्रेरणादायी
कोल्हापूर : कोल्हापूर सर्जिकल सोसायटी या संघटनेने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केले आहे. हे कार्य देशपातळीवरील नवोदित शल्य विशारदांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ऑल इंडिया सर्जिकल फेडरेशनचे अध्यक्ष डाॅ. अभय दळवी यांनी व्यक्त केले. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे डाॅ. डी. वाय. पाटील हाॅस्पिटल येथे शनिवारी आयोजित दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डाॅ. दळवी म्हणाले, अशा प्रकारच्या वैद्यकीय कार्यशाळेमुळे शल्यविशारदांना मार्गदर्शन मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल आत्मसात करता यावेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी ही परिषद बहुउपयोगी ठरेल.
वाढलेल्या आजारांवर या परिषदेतून चांगली माहिती सर्वांना मिळेल, अशी भूमिका सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. कौस्तुभ कुलकर्णी यांनी विषद केली. मानद सचिव डाॅ.नमिता प्रभू यांनी आभार मानले. या परिषदेस कोषाध्यक्ष डाॅ. मानसिंग नाईक, माजी अध्यक्ष डाॅ. लक्ष्मण कुकरेजा, सल्लागार डाॅ. रवींद्र खोत, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे कार्यकारी सदस्य डाॅ. प्रतापसिंह वरुटे, डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजचे सर्जरी विभागप्रमुख डाॅ. मानसिंग घाटगे, डाॅ. आनंद कामत, कार्यकारी सदस्य डाॅ. महेश प्रभू, डाॅ. शीतल मुरचिते, डाॅ. नितीन पाटील, डाॅ. सचिन शिंदे, डाॅ. सौरभ गांधी, डाॅ. बसवराज कडलगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या दरम्यान डाॅ. डी. वाय. पाटील हाॅस्पिटल येथे विविध आजारांवरील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यात ओपन हर्निया, थायराॅइड, पॅराटिड, अपाॅडीस्टोमी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांकरिता कोईमतूरचे नामांकित शल्य विशारद डाॅ. आर. पार्थसारथी, डाॅ. देवेंद्र चौकार, हुबळीचे डाॅ. सुनील कारी, डाॅ. पी. सी. पाटील, डाॅ. अशोक धोंडे, सूरज दिघे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
आज परिषदेत
आज, रविवारी कोईमतूरचे डाॅ. आर. पार्थसारथी हे कमीत कमी हालचालींची शस्त्रक्रिया -सध्याच्या मानांकनानुसार उत्क्रांती यावर व हुबळीचे डाॅ. कारी हे डायबेटिक फूड मॅनेजमेंट-सामान्य शस्त्रक्रियेमध्ये एक नवीन उदयोन्मुख उपविशिष्टता या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
फोटो : १३०२२०२१-कोल-केएसएसी०२
आेळी : कोल्हापुरातील डाॅ.डी.वाय.पाटील हाॅस्पिटलमध्ये दोन दिवसीय केएसएस-काॅन वैद्यकीय परिषदेचे शनिवारी डाॅ. अभय दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी डाॅ. कौस्तुभ कुलकर्णी, डाॅ. नमिता प्रभू, डाॅ.मानसिंग घाटगे, डाॅ. आर. पार्थसारथी आदी मान्यवर उपस्थित होते.