आयजीएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:37+5:302021-09-04T04:29:37+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात कोरोना काळात काम केलेल्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा आदेश निघाला आहे. त्यामुळे ...

आयजीएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात कोरोना काळात काम केलेल्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा आदेश निघाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर जमून काम बंद आंदोलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णालय जाहीर करण्यात आले. रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्याने ३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. आता संसर्ग कमी होत असल्याने १६ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांना घेराव घातला. यावेळी डॉ. शेट्ये यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आदेशानुसार कंत्राटी २० कर्मचाऱ्यांना कामावर नियमित हजर राहता येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचारी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत काम बंद ठेवून रुग्णालयासमोर जमले. यावेळी ऐन सणासुदीच्या तोंडावर कामावरून कमी न करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.