कोल्हापूर जिल्'ातील गटविकास अधिकाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 21:00 IST2017-11-03T20:57:37+5:302017-11-03T21:00:47+5:30

कोल्हापूर : जळगाव जिल्'ातील चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे

 'Work Stop' movement of District Development Officer of Kolhapur District | कोल्हापूर जिल्'ातील गटविकास अधिकाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन

कोल्हापूर जिल्'ातील गटविकास अधिकाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन

ठळक मुद्दे चाळीसगावमधील पदाधिकाºयांच्या वर्तणुकीचा निषेधघटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा गटातील सर्व अधिकारी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर

कोल्हापूर : जळगाव जिल्'ातील चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी वागणूक देणाºया पदाधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी जिल्'ातील महाराष्ट्र विकास सेवा गटातील अधिकाºयांनी शुक्रवारी दिवसभर काळ्या फिती लावून ‘काम बंद’ आंदोलन केले.

चाळीसगावचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिली. याला कंटाळून वाघ यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा गटातील सर्व अधिकारी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जमले. यावेळी झालेली घटना विशद करण्यात आली. सर्व अधिकारी काळ्या फिती लावून आले होते.

या अधिकाºयांनी दिवसभर जिल्हा परिषदेच्या ध्वजस्तंभाजवळ बैठक मारून काम बंद आंदोलन केले. संध्याकाळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकाºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन त्यांना संबंधित पदाधिकाºयांवर कारवाईची मागणी केली.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सुषमा देसाई, प्रियदर्शिनी मोरे, माधुरी परीट, सचिन घाटगे, उदय पाटील, संजय केळकर, उमा घारगे, शरदचंद्र माळी, प्रदीप जगदाळे, शरद भोसले, श्रीमती चंचल पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.


चाळीसगावच्या गटविकास अधिकाºयांना अवमानकारक वागणूक दिल्याबद्दल कोल्हापूर जिल्'ातील अधिकाºयांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना निवेदन दिले.
 

 

Web Title:  'Work Stop' movement of District Development Officer of Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.