शारंगधर देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST2021-09-07T04:30:23+5:302021-09-07T04:30:23+5:30

: विविध विधायक उपक्रमांनी वाढदिवस कळंबा : शहराच्या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी झटणारे महापालिकेतील अभ्यासू नेतृत्व आणि उपनगरांच्या विकासाचा ...

The work of Sharangdhar Deshmukh is admirable | शारंगधर देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद

शारंगधर देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद

: विविध विधायक उपक्रमांनी वाढदिवस

कळंबा : शहराच्या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी झटणारे महापालिकेतील अभ्यासू नेतृत्व आणि उपनगरांच्या विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून शारंगधर देशमुख यांची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार आमदार जयंत आसगावकर यांनी काढले. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख होते. देशमुख यांच्या

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, वृद्धाश्रमात फळे ,धान्यवाटप या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शारंगधर देशमुख यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधायक सामाजिक कार्य करण्याचे पाठबळ मिळाल्याचे सांगितले. यावेळी देशमुख यांना विविध राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: The work of Sharangdhar Deshmukh is admirable