गुडाळवाडीत दरड हटवण्याचे काम सलग दुसऱ्यादिवशीही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:29+5:302021-09-14T04:28:29+5:30

गुडाळ - राधानगरी रस्त्यावर गुडाळवाडीनजीक काल रविवारी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित विभागाच्यावतीने कोसळलेली दरड काढण्याचे कार्य ...

The work of removing pain in Gudalwadi continues for the second day in a row | गुडाळवाडीत दरड हटवण्याचे काम सलग दुसऱ्यादिवशीही सुरू

गुडाळवाडीत दरड हटवण्याचे काम सलग दुसऱ्यादिवशीही सुरू

गुडाळ - राधानगरी रस्त्यावर गुडाळवाडीनजीक काल रविवारी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित विभागाच्यावतीने कोसळलेली दरड काढण्याचे कार्य सुरू असतानाच, पुन्हा सायंकाळी दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद झाला होता. आज, सोमवार सकाळपासून दरड हटवण्याचे काम सुरू सुरू झाले.

दरम्यान, दरड कोसळलेल्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने भराव काढून मुरूम विक्री केली जात असल्याचा आरोप करत कामाची चौकशी करण्याची मागणी करत काही काळ भराव हटविण्याचे काम थांबवले.

काल रविवार सकाळी गुडाळवाडीनजीक रस्त्यावर कोसळलेली दरड काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम आज सकाळपासून सुरू होते. हे काम करत असताना चुकीची पध्दत वापरल्याने डोंगरावरील मुरूम मोठ्याप्रमाणात घसरत आहे. संबंधित विभाग हा रस्ता मोकळा न करता मोठमोठे दगड बाजूला करत फक्त मुरूम काढून विक्री करत असल्याचा आरोप शेतकरी नामदेव पाटील आणि पांडुरंग पाटील यांनी करत मुरूम अन्यत्र न हलवता रस्ता माजबुतीकरणासाठी वापरण्याची मागणी केली.

यावेळी संबंधित बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समोर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाहतूक होणारा मुरुम नेमका कुठे जातोय, अशी विचारणा पंचायत समितीचे सदस्य दिलीप कांबळे यांनी केली असता सांगण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता आपल्याला माहिती नसल्याचे सांगत चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले.

फोटो कॅप्शन - गुडाळवाडीनजीक कोसळलेली दरड हटवण्याचे काम आज सलग दुसऱ्यादिवशीही सुरू होते.

छाया / रमेश साबळे

Web Title: The work of removing pain in Gudalwadi continues for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.