रेल्वे उड्डाणपुलाचे काम बेळगावमध्ये बंद पाडले
By Admin | Updated: May 23, 2015 00:22 IST2015-05-23T00:18:08+5:302015-05-23T00:22:22+5:30
रेल्वे ओवर ब्रिज करण्यासाठी रेल्वे खात्याने १४ कोटी, तर कर्नाटक सरकारने सहाकोटी असा २० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, प्लॅनप्रमाणे गुडस् शेड रोड ते हेमू कलानी चौकापर्यंत आहे

रेल्वे उड्डाणपुलाचे काम बेळगावमध्ये बंद पाडले
बेळगाव :शहरातील कपिलेश्वर रोड रेल्वे ओवर ब्रीजचे काम सुरूकरायला गेलेल्या रेल्वे खाते आणि जिल्हा प्रशासनाला स्थानिक लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला असून, शुक्रवारी रेल्वे पुलाचे काम स्थानिकांनी बंद पाडले. यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये जोरदार खडाजंगीझाली बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वर रोड रेल्वे ओवर ब्रिज करण्यासाठी रेल्वे खात्याने १४ कोटी, तर कर्नाटक सरकारने सहाकोटी असा २० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, हा रेल्वे उड्डाणपूल सीडीपी प्लॅनप्रमाणे गुडस् शेड रोड ते हेमू कलानी चौकापर्यंत आहे. याशिवाय जुना पी बी रोड १२० फूट रुंदीचा सीडीपीप्रमाणे असताना स्थानिक माजी लोकप्रतिनिधींच्या संपत्तीला नुकसान होते म्हणून इथे उड्डाण पूल करण्याऐवजी कपिलेश्वर रोडमधून करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात कपिलेश्वर रोड व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली होती.न्यायालयाने स्थानिक लोकांच्या संपत्तीला धक्का न पोचवता रेल्वे ओवर ब्रिजचे काम करा, असा आदेश दिला आहे. कोर्टाने उड्डाणपुलाचे काम करा, असा आदेश दाखवत आज रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने काम सुरू करण्याचा प्रयत्नकेला. मात्र, स्थानिक लोकांनी विरोधकरीत हे काम बंद पाडले. यावेळी स्थानिक लोक आणि पोलीसयांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र, लोकांच्या विरोधापुढे काम बंद करावे लागले. रेल्वे अधिकारी आणि महापालिका कर्मऱ्यांनी कामाची जेसीबीने सुरुवात करताच भांडूर गल्ली, तहसीलदार गल्ली आणि कपिलेश्वर रोडमधील शेकडो महिला, युवक आणि कार्यकर्ते जेसीबीसमोर येऊन झोपले. त्यानंतर तब्बल दोन तास या भागात तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अनुप अगरवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस देखील हजर होते. पोलिसांनी स्थानिक लोकांना समजविण्याचा प्रयत्नकेला.
मात्र, लोक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी कोर्टाची पुढील सुनावणी १ जूनला आहे. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्यावर स्थानिक लोकांचा राग कमी झाला.