शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम

By विश्वास पाटील | Updated: January 27, 2023 13:03 IST

कोल्हापूर जिल्ह्यात ईकेवायसीचे ७२ हजार प्रस्ताव प्रलंबित

विश्वास पाटीलकोल्हापूर : कृषी की महसूल विभागाने यापुढे योजना राबवायची, या घोळात राज्यभरातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. शासनस्तरावरच त्याबद्दलची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे. नवी नोंदणी पूर्णत: बंदच आहे.घडले ते असे : ही मूळ योजना कृषी विभागाची. ती सुरू झाली २०१९मध्ये. त्याचा शासन आदेशही कृषी विभागाचाच. परंतु त्यासाठी लागणारे कागदोपत्री पुरावे हे महसूल विभागाशी संबंधित. पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून योजना राबवण्याचा दबाव असल्याने महसूल खात्याने ही योजना राबवली. लॉगिन आयडी व पासवर्ड महसूल, कृषी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावांवरच तयार झाले. महाराष्ट्रात या योजनेचे चांगले काम झाल्यामुळे कृषी आयुक्तांना त्याबद्दल पुरस्कार मिळाला. तिथे माशी शिंकली. काम महसूलचे आणि पुरस्कार कृषी विभागाला का, असा मुद्दा पुढे आला. त्यातून ही योजना कृषी विभागानेच राबवावी, असा दबाव महसूलकडून सुरू झाला. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये जी अजून ७ लाख ९० अर्जांची पडताळणी झाली नाही ती महसूल विभागाने पूर्ण करावी आणि मग ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचे ठरले. परंतु, ही पडताळणीच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे योजनाही कृषी विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड तयार झालेले नाहीत. कृषी विभागाकडे योजना राबविण्यासाठी पुरेसा कर्मचारी नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात ईकेवायसीचे ७२ हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. राज्य शासनाच्या स्तरावर रितसर शासन आदेश काढून ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित व्हायला हवी. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे सध्यातरी या योजनेला कुणीच वाली नाही, अशी स्थिती आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

सध्या खोळंबलेली कामे

  • नवीन नोंदणी
  • पात्र होतो परंतु आता अपात्र झाल्याने हप्ता बंद
  • केवायसी केली, यादीत नाव आले. परंतु हप्ता आला नाही
  • खात्यातील चुकांमुळे पैसे बंद
  • केवायसी केली, दोन हप्ते आले, पण आता अचानक बंद
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी