शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गांधीनगर पाणी योजनेचे काम ठप्प, ३४३ कोटींची १३ गावांसाठी योजना

By भीमगोंड देसाई | Updated: November 27, 2023 13:47 IST

ठेकेदारास दंडाची कारवाई प्रस्तावित, केवळ २० टक्क काम पूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : तेरा गावच्या गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. तब्बल ३४३ कोटी ६८ लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनीकडून अपेक्षित गतीने होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. काम सुरू होऊन नोव्हेंबरअखेर एक वर्ष होत आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के काम झाले आहे. तेरा गावात पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आणि पाइपलाइन बांधण्यासाठी खड्डे पडले आहेत. रहिवासी ठिकाणी खड्डे असल्याने ते धोकादायक बनले आहेत.शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०५४ पर्यंतच्या लोकसंख्येेला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी योजना मंजूर आहे. यासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, योजनेचे काम नोव्हेंबर २०२२ पासून ठेकेदार कंपनी करीत आहे. खडीच्या गणपतीजवळ पाचगावसाठी टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खणला आहे. मात्र, अजून येथे बांधकामही सुरू झालेले नाही. यांच्याजवळच मोरेवाडी गावासाठी पाण्याच्या टाकीचे कामही पन्नास टक्के पूर्ण होऊन थांबले आहे. अशाच प्रकार पाचगाव, मोरेवाडी, कळंबा अशा तेरा गावात पाण्याची टाकी, पाइपलाइनसाठी पावसाळ्यापूर्वी खोदाई करण्यात आली आहे; पण तिथे सध्या कोणतेही काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यानंतर ठेकेदार कामासाठी फिरकलाच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपेक्षित गतीने काम होत नसल्याने पुरेशा प्रमाणत आणि स्वच्छ पाणी मिळण्यास विलंब होणार आहे. आता अस्तित्वात असलेल्या पाणी योजनेला प्रचंड गळीत आहे. सर्व भागात समान पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते.परिणामी, नवीन पाणी योजना शक्य तितकी लवकर पूर्ण व्हावी, यासाठी तेरा गावचे सरपंच, उपसरपंच धडपडत आहेत. ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना शनिवारी सरपंचांच्या शिष्टमंडळाने जाब विचारला.

दृष्टिक्षेपातील योजना

  • खर्च : ३४३ कोटी ६८ लाख ६१ हजार
  • पाण्याचा स्रोत : दूधगंगा नदी
  • प्रशासकीय मंजुरी : १७ जून २०२२
  • काम कार्यारंभ आदेश : ७ नोव्हेंबर २०२२
  • काम पूर्ण करण्याचा कालावधी : २७ महिने.

योजनेतील गावे : गांधीनगर, उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, वळीवडे, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे.

गेले कित्येक दिवस ठेकेदार कंपनीकडून काम संथ गतीने होत आहे. सध्या अनेक ठिकाणी काम बंद आहे. तेरा गावांतील ग्रामस्थांना मुबलक, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गतीने काम करून योजना पूर्ण करावी. - संग्राम पाटील, माजी सरपंच, पाचगाव.

योजनेचे काम आतापर्यंत ४० टक्क्यांपर्यंत होणे अपेक्षित होते; पण केवळ २५ टक्के काम झाले आहे. म्हणून कंपनीवर दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे. - अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी