कोविड योद्धांचे कार्य दीपस्तंभासारखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:53+5:302021-07-18T04:17:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे आहे. ...

कोविड योद्धांचे कार्य दीपस्तंभासारखे
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील सर्वच क्षेत्रातील
व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे आहे. हे कोविड योद्धे समाजाचे दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
उचगाव (ता.करवीर) येथे कै.रामभाऊ चव्हाण (दादा) यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी व महाडिकप्रेमी व एन.डी. ग्रुप यांच्यावतीने
कोविड काळात करत असलेल्या समाजातील विविध घटकांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उचगाव कोविड सेंटरला मदत करणारे डॉक्टर्स, युवा ग्रामीण विकास संस्था, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, संत निरांकरी सेवा मंडळ, महसूल विभाग, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य महेश चौगुले, ग्रा.पं. सदस्य रमेश वाईंगडे, संगीता दळवी, विजय यादव, अनिल शिंदे, राजू संकपाळ, दत्तात्रय तोरस्कर, शैलजा पाटील, राजू चौगुले, निवास यमगर, नामदेव वाईंगडे, संदीप पाटील, प्रकाश रेडेकर, रवी एडके, सुहास पाटील, राजू पोवार, विजय हंकारे, विनोद थोरात, अमोल वाईंगडे, संदीप म्हसवेकर, पवन यमगरणी, करण यादव उपस्थित होते.
१७ उचगाव धनंजय महाडिक
फोटो ओळ:उचगाव येथे कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध स्तरातील व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी आशा वर्कर यांच्या सन्मान करताना माजी खासदार धनंजय महाडिक, दत्तात्रय तोरस्कर,एन.डी. वाईगडे,महेश चोगुले आदी.