शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कोल्हापूर शिवाजी पुलाचे काम बंद; ठेकेदाराचा निर्णय : उपअभियंत्यावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:42 IST

शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत

ठळक मुद्दे९० लाखांत फेरफार करून फक्त ९ लाख मंजुरीसाठी; आबदारांच्या बदलीची मागणी

कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्यासारख्या मनोवृत्तीचे अधिकारी पुलावर क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत असतील तर येथून पुढे पुलाचे काम आम्ही करणार नाही, असा निर्णय मंगळवारी सायंकाळी ठेकेदार आसमास कंपनीचे एन. डी. लाड यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.

ठेकेदार लाड म्हणाले, पर्यायी शिवाजी पुलाचे उर्वरित काम गतीने सुरू आहे. कामावरील क्षेत्रीय अधिकारी उपअभियंता संपत आबदार हे काम सुरू झाल्यापासून वादग्रस्त आहेत. पुलाच्या ‘अबेटमेंट’चा खर्च वाढला आहे. त्याची माहिती आबदार यांना आहे; त्यांनी तरीही ‘हार्ड रॉक’ (कठीण खडक) लागला नाही म्हणून निविदेवरील तरतुदीपेक्षा खोलवर खुदाई करून घेतली; त्यामुळे पुलाचे डिझाईन बदलले. त्याचा खर्चही वाढला; पण वाढीव खर्चाच्या मंजुरीची जबाबदारी उपअभियंता आबदार यांनी घेऊन ‘जनक्षोभ असल्याने काम सुरू ठेवा; वाढीव खर्चाची वरिष्ठांकडून मंजुरी घेऊ,’ असे सांगितले.

त्याची लेखी कल्पना मी मुख्य अभियंता विनय देशपांडे, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांना वेळोवेळी दिली; पण उपअभियंता आबदार यांनी खर्चाचे फेरअंदाजपत्रक करतो, असे सांगूनही ते केले नाही.वाढीव काम होत असल्याने त्याची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली; पण वाढीव कामाची बिले मुंबईत कार्यालयाकडे पाठविण्याऐवजी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यातच फिरत आहे. सव्वा कोटी रुपयांचे काम झाले असताना प्रथम ६३ लाखांच्या बिलाची मंजूर घेण्यासाठी हालचाली झाल्या; त्यावेळी मी नकार दिल्याने ते बिल ९० लाख रुपयांचे काढले, ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले; पण पुन्हा दुरुस्तीसाठी आल्यानंतर ते उपअभियंता आबदार यांनी कमी करून फक्त नऊ लाख केले आहे.

त्याबाबत मंगळवारी बैठक आयोजित केली होती; पण आबदार यांनी त्या बैठकीस दांडी मारली. त्याची तक्रार आपण मुंबईच्या राष्टय महामार्ग कार्यालयाकडे कळविली. त्यामुळे आबदार यांच्यासारख्या मनोवृत्तीचे अधिकारी या पुलासाठी काम करत असतील तर आपण हे काम बंद ठेवणार आहोत, असा निर्णय घेतल्याचे ठेकेदार एन. डी. लाड यांनी सांगितले.निविदा काढतानाच वाढीव तरतूद आवश्यकउपअभियंता आबदार यांच्या काळातच नवीन निविदा काढली. त्यावेळी वाढीव कामाची तरतूद करणे आवश्यक होते. पुलाच्या कमानीतील भराव काढणे व भरणे, स्मशानभूमीपासून सेवा रस्त्याची निर्मिती, अबेटमेंटचे काम खोलवर गेल्याने ते ८० लाखांनी वाढले आहे.मुंबईत आज बैठक उपअभियंता आबदार यांच्या पराक्रमाचे किस्से मुंबईतील कार्यालयात पोहोचल्याने मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी ठेकेदार लाड, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांची बैठक आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात बोलाविली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग