समाजवादी प्रबोधिनीकडून वैचारिक संघर्ष करण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:09+5:302021-01-08T05:22:09+5:30

वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : लोकप्रबोधन करणारी संस्था ही समाजात सर्वांगीण समता प्रस्थापित व्हावी, यासाठी सतत ...

The work of ideological struggle from the Socialist Academy | समाजवादी प्रबोधिनीकडून वैचारिक संघर्ष करण्याचे काम

समाजवादी प्रबोधिनीकडून वैचारिक संघर्ष करण्याचे काम

वार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : लोकप्रबोधन करणारी संस्था ही समाजात सर्वांगीण समता प्रस्थापित व्हावी, यासाठी सतत संघर्ष करीत असते. सामाजिक शांततेसाठी वैचारिक संघर्ष करण्याचे काम समाजवादी प्रबोधिनी गेली ४३ वर्षे सातत्याने करीत आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले.

येथील समाजवादी प्रबोधिनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सुरुवातीला सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रबोधिनीच्या वाटचालीचा आढावा घेतला. विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. चर्चेत प्राचार्य विश्वास सायनाकर, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. सुनील हेळकर, बी. एस. खामकर, आदींनी सहभाग घेतला. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, के. एस. दानवाडे, प्रा. अनिल उंदरे, अन्वर पटेल, नंदा हालभावी, अश्विनी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

(फोटो ओळी)

०६०१२०२१-आयसीएच-०१

समाजवादी प्रबोधिनीच्या वार्षिक सभेत प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसाद कुलकर्णी, विश्वास सायनाकर व डॉ. टी. एस. पाटील उपस्थित होते.

Web Title: The work of ideological struggle from the Socialist Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.