कोरोना काळातील आरोग्यसेवकांचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:31+5:302021-06-19T04:16:31+5:30

: युवा स्पोर्ट्स व ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार वाघापूर : कोरोना काळातील आरोग्यसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे ...

The work of health workers in the Corona period is admirable | कोरोना काळातील आरोग्यसेवकांचे काम कौतुकास्पद

कोरोना काळातील आरोग्यसेवकांचे काम कौतुकास्पद

: युवा स्पोर्ट्स व ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

वाघापूर : कोरोना काळातील आरोग्यसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पं. स. नूतन सभापती अक्काताई नलवडे यांनी केले.

आदमापूर (ता. भुदरगड) येथे कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना देण्यात आलेल्या कोरोना योद्धा सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते सभापती अक्काताई नलवडे यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच विजयराव गुरव म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या अनेक नवनवीन योजना सुरू आहेत. घंटागाडी, सौरऊर्जा ही कामेही लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सरपंच विजयराव गुरव, उपसरपंच राजनंदिनी भोसले, ग्रामपंचायत सदस्य तसेच शरद निंबाळकर, बी. एस. खापरे, डाॅ. सागर नाईक, अभिजित देसाई, दिलीप पाटील, तलाठी तानाजी पाटील, ज्ञानदेव पाटील, विठ्ठल पाटील, युवा स्पोर्ट्सचे पदाधिकारी, बाजीराव जठार आदी उपस्थित होते.

आभार सचिन पाटील यांनी मानले.

फोटो ओळी : आदमापूर (ता. भुदरगड) येथे कोरोना योद्धा सन्मान प्रसंगी बोलताना नूतन सभापती अक्काताई नलवडे, शेजारी सरपंच विजयराव गुरव, उपसरपंच राजनंदिनी भोसले आदी.

(छायाचित्रे : बाजीराव जठार, वाघापूर)

Web Title: The work of health workers in the Corona period is admirable