‘गुरुदत्त’चे चारा छावणीचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:42+5:302021-07-28T04:25:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी गुरुदत्त शुगर्सने सुरू केलेल्या चारा छावणीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ...

‘गुरुदत्त’चे चारा छावणीचे कार्य कौतुकास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी गुरुदत्त शुगर्सने सुरू केलेल्या चारा छावणीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी काढले.
‘गोकुळ’च्या वतीने शिरोळ तालुक्यातील चारा छावणीतील जनावरांसाठी दहा टन पशुखाद्य देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी सामाजिक बांधीलकेच्या भावनेतून कार्य स्थळावर छावणी उभा करून १८०० पूरग्रस्तांना व त्यांच्या ७०० जनावरांना मोठा आधार दिला आहे. पूरग्रस्तांच्या मुक्या जनावरांना स्वतःच्या ३५ एकर शेतातील ऊस चारा दिल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील जनावरांच्या औषध उपचारांसाठी संघाच्या दहा डॉक्टरांचे पथक तयार केले असून, ती सेवा चोवीस तास चालू असून, महापुरात व महापुरानंतर जनावरांना रोगराई होऊ नये यासाठीही पूरग्रस्त भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत इतर सर्व खबरदारी घेण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले, संजय गायकवाड, उमेश पाटील (टाकळीकर) गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी विकास चौगले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या वतीने शिरोळ तालुक्यातील जनावरांच्या छावणीला पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके, अरुण डोंगळे, आदी उपस्थित होते. (फाेटो-२७०७२०२१-कोल-गोकुळ)