भुदरगड तालुक्यात गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:05+5:302021-08-27T04:27:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : गारगोटी : गणरायाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक राहिल्याने भुदरगड तालुक्यातील कुंभार बांधव आणि मूर्तीकारांचे गणेशमूर्तीचे ...

भुदरगड तालुक्यात गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क : गारगोटी :
गणरायाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक राहिल्याने भुदरगड तालुक्यातील कुंभार बांधव आणि मूर्तीकारांचे गणेशमूर्तीचे काम संपविण्यासाठी लगबग सुरू आहे. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून, भक्तांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे रंग देण्याची सुरुवात झाली आहे. गणपती उत्सव सप्टेंबर महिन्यात येत असल्याने सणाचे वेध अबालवृध्दांना लागले आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षी गणेशत्सोव सुनासुना झाला होता. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात होण्याचा अंदाज आहे.
गणेशमूर्ती कारागीरांवर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आणि चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बनवण्यास शासनाने बंदी आणल्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती मागणीमध्ये कमतरता दिसून येत आहे. सध्या घरगुती मूर्ती बुकिंग सुरू असल्याने मूर्तिकार मूर्ती रंगवण्याच्या कामात व्यस्त आहेत. तालुक्यातील घरगुती मूर्तीमध्ये जवळजवळ ७५ टक्के मूर्तींचे बुकिंग झाले असून, भक्तांच्या इच्छेनुसार मूर्ती घडविण्यात येत आहेत. यावर्षी दगडूशेठ, लालबागचा राजा, वरदहस्त, सिंगल लोड, शिवरेकर, वेलिंग आदी मूर्तींना मागणी जास्त आहे. तसेच मागणीनुसार कलर दिले जात असल्याचे गारगोटी येथील कारागीर भरत कुंभार यांनी सांगितले .
फोटो ओळ - कूर येथे गणेश मूर्तीला रंगरंगोटी करताना कारागीर संजय कुंभार.
२६ कूर गणेशोत्सव