बावडा रेस्क्यू फोर्सचे काम देवदूतासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST2021-02-13T04:23:16+5:302021-02-13T04:23:16+5:30

कसबा बावडा : कसबा बावडा येथील रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांचे काम एखाद्या देवदूतासारखे आहे, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी ...

The work of Bavda Rescue Force is like an angel | बावडा रेस्क्यू फोर्सचे काम देवदूतासारखे

बावडा रेस्क्यू फोर्सचे काम देवदूतासारखे

कसबा बावडा :

कसबा बावडा येथील रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांचे काम एखाद्या देवदूतासारखे आहे, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. बावडा रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांनी वन्य जिवांची काळजी घेताना स्वतःला काही इजा होणार नाही, याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी बावडा रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांसह राजाराम बंधारा ग्रुप, पॅव्हेलियन वृक्षप्रेमी ग्रुप, कोविड काळात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले स्वयंसेवक यांच्या कामाचेही कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व वाईल्डलाईफ फोटोग्राफर देवेंद्र भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, अशोक जाधव, सुभाष बुचडे, प्रा. महादेव नरके, पी. डी. माने, गजानन बेडेकर, मिलिंद पाटील, अशांत मोरे, मानसिंग जाधव, जितू केंबळे, तानाजी चव्हाण, सरदार पाटील, परशराम पाटील, रघुनाथ पाटील उपस्थित होते.

फोटो: १२ बावडा रेस्क्यू फोर्स

बावडा रेस्क्यू फोर्स स्वयंसेवकांच्या स्नेहमेळाव्यात आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The work of Bavda Rescue Force is like an angel