बटकडली परिवाराचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:14+5:302021-08-21T04:29:14+5:30
गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर भरवून कडगाव पंचक्रोशीतील गोर-गरीब रुग्णांना दिलासा देणाऱ्या बटकडली परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे, ...

बटकडली परिवाराचे कार्य कौतुकास्पद
गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर भरवून कडगाव पंचक्रोशीतील गोर-गरीब रुग्णांना दिलासा देणाऱ्या बटकडली परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी काढले.
कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे अनुसया बटकडली यांचा स्मृतीदिन व सुरेश बटकडली यांच्या जयंतीनिमित्त केदारलिंग हायस्कूलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिवंगत नागाप्पाण्णा बटकडली यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी समर्थपणे पुढे चालविला आहे, असेही ते म्हणाले.
शिबिरात कडगाव व परिसरातील १६० महिलांची हिमोग्लोबीन व कॅल्शिअम तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी डॉ. किरण हत्ती, डॉ. मल्लिकार्जुन अथणी, अजित जामदार यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास उपसरपंच पद्मजा चिक्कोडे, प्राचार्या अंजली घुळाण्णावर, ग्रामविकास अधिकारी संजीव डवरी, संग्रामसिंह घाटगे, बाळासाहेब सावंत, पुंडलिक चिक्कोडे, पांडुरंग पाटील, विलास पाटील, विजय परीट, संग्राम पाटील, प्रकाश नार्वेकर, वैभव कागवाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच संजय बटकडली यांनी प्रास्ताविक केले. सयाजी भोसले यांनी आभार मानले.
चौकट :
कोरोना योद्धांचा गौरव
कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. दिलीप आंबोळे, डॉ. मल्लिकार्जुन अथणी, डॉ, गीता कोरे यांच्यासह आरोग्यसेविका आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व सेविका आणि कोरोना दक्षता कमिटी सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो ओळी : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे डॉ. दिलीप आंबोळे यांचा विलास पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी डॉ. किरण हत्ती, डॉ. मल्लिकार्जुन अथणी उपस्थित होते.
क्रमांक : २००८२०२१-गड-११