तंबाखू संघासाठी बापूसोा डोंगळेचे कार्य मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:10+5:302021-09-08T04:31:10+5:30
घोटवडे (ता. राधानगरी) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी तंबाखू संघाचे माजी अध्यक्ष कै. बापूसोा संभाजी डोंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ...

तंबाखू संघासाठी बापूसोा डोंगळेचे कार्य मोलाचे
घोटवडे (ता. राधानगरी) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी तंबाखू संघाचे माजी अध्यक्ष कै. बापूसोा संभाजी डोंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक उधळपट्टी व नियोजन शून्य कारभारामुळे अनेक संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या. काही दिवाळखोरीत निघाल्या. मात्र, बापूसोा डोंगळे यांनी प्रामाणिक व काटकसर करून तंबाखू संघाचा नावलौकिक केला. त्याचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे.
यावेळी तंबाखू संघाचे उपाध्यक्ष रावसोा डोंगळे, अनिल डोंगळे, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, संदीप पाटील, के. द. पाटील, संजय डोंगळे, संतोष देवकर उपस्थित होते.
फोटो ओळी :
तंबाखू संघाचे माजी अध्यक्ष बापूसोा डोंगळे यांना अभिवादन करताना सुशील पाटील- कौलवकर धीरज डोंगळे, केरबा पाटील, शिवाजी पाटील.