साई सर्व्हिसतर्फे महिला महोत्सव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:51+5:302021-03-09T04:26:51+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात १५ शोरूम आणि वर्कशॉपसह अविरत सेवा मारुती सुझुकीचे मुख्य वितरक साई सर्व्हिस देते. त्यांच्यामार्फत जागतिक महिला ...

साई सर्व्हिसतर्फे महिला महोत्सव सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यात १५ शोरूम आणि वर्कशॉपसह अविरत सेवा मारुती सुझुकीचे मुख्य वितरक साई सर्व्हिस देते. त्यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ ते दि. १४ मार्च दरम्यान कार चालविणाऱ्या महिलांसाठी एक वेगळा महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवात एकूण सात आकर्षक उपक्रम आहेत. त्यात शोध कोल्हापूरचा, मेहंदी, कराओके, टॅलेंट हंट, ड्रायव्हिंग टिप्स, सबसे प्यारा मास्क मेरा, महिला आणि योगाचे महत्व असे उपक्रम आहेत. महिलांसाठी बलेनो किंवा इग्नीस कारची टेस्ट ड्राइव्ह घेतल्यावर हमखास भेटवस्तू मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी व्हा. आनंद घ्या, मनोरंजनासह ज्ञान वाढविण्यासह भेटवस्तू मिळविण्याची संधी आहे. या महोत्सवातील बक्षीस वितरण दि. १५ मार्च रोजी होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी नेक्सा कोल्हापूर शोरूम (ओपल हॉटेल) येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन साई सर्व्हिसने केले आहे.