भुदरगड पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:52+5:302021-06-25T04:18:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : गारगोटी-सोनाळी येथील दारू अड्डा बंद करावा यासाठी सोनाळी येथील महिलांनीच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ...

Women's Morcha at Bhudargad Police Station | भुदरगड पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

भुदरगड पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : गारगोटी-सोनाळी येथील दारू अड्डा बंद करावा यासाठी सोनाळी येथील महिलांनीच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी छापा मारून कृष्णात साताप्पा हिलगे याच्या घरातील तीन हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सोनाळी येथील दारू अड्डा बंद करावा या मागणीसाठी महिलांनी बुधवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. येथे विकल्या जाणाऱ्या सुमार दर्जाची गावठी दारू पिऊन दोन तरुणांचा मृत्यू तर आणखी एकजण गंभीर झाल्याची चर्चा सुरू होती. या प्रकरणी कृष्णात सात्ताप्पा हिलगे याला अटक करण्यात आली आहे.

भुदरगड तालुक्यात परिचित असणाऱ्या देवकेवाडी, केळेवाडी, जखिनपेठ, पंडिवरे आदी डोंगराळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या या गावातील काही लोक हातभट्टीवर दारू काढतात. ही दारू विक्रीसाठी गावोगावी पुरविली जाते.

२४ गारगोटी महिला मोर्चा

फोटो ओळ

गारगोटी पोलीस ठाण्यात मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आलेल्या सोनाळी येथील रणरागिणी महिला.

Web Title: Women's Morcha at Bhudargad Police Station