शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Women's Day Special : कोल्हापूरात अभाविपतर्फे ११११ फुट तिरंगा ध्वजासोबत पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:23 PM

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देमहिला दिनाचे औचित्य ११२५ युवती सहभागी, सैनिकांना आदरांजली

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या.जागतिक महिला दिनानिमित पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी ही ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.देश हमे देता है सब कुछ, हम भी कूछ देना सिखे असा राष्ट्रभक्तीचा संदेश देत आणि एक कदम जवानों के लिए, एक कदम देश के लिए अशा संदेश फलकासह भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ही पदयात्रा शहरातील उभा मारुती चौक येथून निघाली. पोलिस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे आणि विद्यार्थी परिषदेच्या प्रांत विद्यार्थिनी प्रमुख केतक कोळेश्वर यांनी या पदयात्रेचे उद्घाटन केले.

निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सीपीआर ते दसरा चौक या मार्गावरुन निघालेल्या या पदयात्रेत कोल्हापूर शहरातील विद्यार्थिनी, युवती आणि महिला सहभागी झाल्या होत्या. बिंदू चौकात या पदयात्रेचा वंदे मातरमने समारोप झाला.

यावेळी देशाप्रती विद्यार्थ्यांमध्ये संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थी परिषद करते आहे, ही तिरंगा पदयात्रा याचाच एक भाग असल्याचे सांगून अभाविपच्या महाराष्ट्र प्रांत विद्यार्थिनी प्रमुख केतकी कोळेश्वर यांनी विद्यार्थिंनींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या मिशन साहसी उपक्रमातून ६ मार्च रोजी देशभरात १0 लाख विद्यार्थिंनीना प्रशिक्षण दिल्याची माहितीही दिली.

या पदयात्रेत अभाविपच्या तिरंगा पदयात्रा प्रमुख ऋतुजा माळी, आदिती करंबे, ऋषिकेश माळी, रेवती पाटील, शीतल कोळी, सायली धनवडे, साधना वैराळे यांच्यासह कोल्हापूर महानगर मंत्री सोहम कुऱ्हाडे, गंधार जोग, आकाश कुलकर्णी, आकाश हटकर, आदित्य परांजपे, श्रीनिवास सूर्यवंशी, गुरुप्रसाद भोसले, गीतेश चव्हाण, मिहीर महाजन, आदि सहभागी झाले होते. कोल्हापूरात अभाविपतर्फे शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनkolhapurकोल्हापूर