शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day 2018 कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:33 IST

राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेटीमुळे महिला प्रवाशांनी एसटीला धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्दे कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!वाहक म्हणूनही महिला कर्मचारीच नियुक्त

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेटीमुळे महिला प्रवाशांनी एसटीला धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले.

कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकांतून कोल्हापूर ते सांगली अशी सोडण्यात आलेली ही केवळ महिलांसाठीची बस उद्घाटनावेळीच हाऊसफुल्ल झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूरहून ४२ तर सांगलीहून ४५ अशा ८७ महिला प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला. दैनंदिन संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी घर, संसार, मुलांबाळाचे संगोपन करून दररोज कामानिमित्त जाताना एस. टी.मधून प्रवास करताना महिलांना जागा न मिळणे, गाडीतील गर्दी यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, खास महिलांसाठीच या विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.महिलांसाठी कोल्हापूर व सांगली विभागांच्या वतीने सुरु केलेल्या या ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसमध्ये वाहक म्हणूनही महिला कर्मचारीच नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.पहिल्या गाडीतील महिला प्रवाशांना महामंडळामार्फत गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आल्या. महामंडळाने सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. पहिल्याच गाडीला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी आगार व्यवस्थापक सुनील जाधव, कामगार अधिकारी प्रविण पाटील, सुरक्षा अधिकारी सुनील भातमाने, लेखापाल उदय देशपांडे, स्थानक प्रमुख संजय शिंदे, अमित कलकुटकी, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कर्मचारी, महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

  1. - कोल्हापूर व सांगली विभागांतर्फे नियोजन
  2. - सकाळी व सायंकाळी दोन सत्रात
  3. - महिलांची गैरसोय टळणार. अशी सुटणार गाडीकोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वाजता परत

सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वा. परत

महिला प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य काही मार्गांवरही अशा प्रकाराच्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्या सोडण्यात येणार आहेत.शैलेंद्र चव्हाण,विभाग नियंत्रक,राज्य परिवहन महांमडळ, कोल्हापूर

 

मी एका खासगी कंपनीत सांगली येथे नोकरीस आहे. त्यामुळे दररोज कोल्हापूर - सांगली असा प्रवास करावा लागतो. घरातून निघताना नेहमी एकच गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार का? हा प्रश्न नियमित पडत असत. मात्र,हा प्रश्न लेडिज स्पेशल एस.टीमुळे आता सुटला आहे.- वृषाली यादव,नोकरदार

माझा स्वत:चा व्यवसाय आहे. आठवड्यातीन किमान तीन ते चारवेळा मला सांगलीला जावे लागते. गाडीतून प्रवास करताना आपल्या शेजारी कोण असेल हा प्रश्न सार्वजनिक प्रवास नेहमीच येतो, मात्र ही फक्त महिलांसाठी गाडी असणार त्यामुळे थोडा आधार वाटतो.- शुंभागी माने,उद्योजिका

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८kolhapurकोल्हापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ