रोजगार प्रशिक्षणातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:27+5:302021-03-09T04:26:27+5:30

कोल्हापूर : रोजगार पूरक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कृत उद्योजकता विकास ...

Women should become self-reliant through employment training | रोजगार प्रशिक्षणातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे

रोजगार प्रशिक्षणातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे

कोल्हापूर : रोजगार पूरक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कृत उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षिका गंधाली दिंडे यांनी व्यक्त केले. त्या अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसमध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांना फिनेल, वाॅशिंग पावडर, लिक्वीड सोप, अगरबत्ती, सेंट व इतर वेगवेगळ्या प्रकारचे लघु उद्योगांचे प्रशिक्षण दिंडे यांनी दिले. वसंतराव मुळीक म्हणाले, महिलांनी उद्योगातून सक्षम बनावे. प्रास्ताविक महिला आघाडीच्या अध्यक्ष शैलजा भोसले व स्वागत दीपा डोणे यांनी केले. संयोगीता देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Women should become self-reliant through employment training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.