राधानगरीत गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:03+5:302021-04-16T04:24:03+5:30

कृषी विभागाच्या या शेती फार्ममध्ये विविध फळझाडांची रोपे तयार केली जातात. यासाठी परिसरातील काही महिला रोजंदारीवर मजूर म्हणून काम ...

Women seriously injured in cow attack in Radhanagar | राधानगरीत गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

राधानगरीत गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

कृषी विभागाच्या या शेती फार्ममध्ये विविध फळझाडांची रोपे तयार केली जातात. यासाठी परिसरातील काही महिला रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी केराबाईंसह चार महिला तिथे भांगलण करीत होत्या. हा परिसर नदीकाठावर असल्याने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आहेत. तेथे गव्यांचे वास्तव्य असते. झुडपात लपलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जोराची धडक देऊन शिंग पोटात खुपसले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. जवळच वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र मोठी जखम असल्याने व जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापुरातील एका खासगी दवाखान्यात त्यांना दाखल करून तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या जिवाचा धोका टळला आहे.

Web Title: Women seriously injured in cow attack in Radhanagar