शिधापत्रिकेवर धान्य मिळण्यासाठी महिलांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:16+5:302021-09-25T04:25:16+5:30

इचलकरंजी : शहरातील प्रभाग क्रमांक १८ व ३१ मध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना केसरी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही. ते ताबडतोब ...

Women march on the provincial office to get grain on ration cards | शिधापत्रिकेवर धान्य मिळण्यासाठी महिलांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

शिधापत्रिकेवर धान्य मिळण्यासाठी महिलांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : शहरातील प्रभाग क्रमांक १८ व ३१ मध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना केसरी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही. ते ताबडतोब मिळावे, या मागणीसाठी स्मिता तेलनाडे व सारिका तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील महिलांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

गावभाग परिसरातील केसरी शिधापत्रिकांवर मिळणारे धान्य बंद झाले आहे. महागाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे. कोरोना व महापुरामुळे नागरिकांची अवस्था बिकट बनली आहे. ज्यांची कागदपत्रे अपुरी आहेत, अशा लोकांकडून कागदपत्रांची पूर्तता करून कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन धान्य कायमस्वरुपी मिळण्याची व्यवस्था करावी. मोर्चामध्ये शोभा पाटील, भारती पाटील, महादेवी मगदूम, संगीता सुतार, मालती चौगुले, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

फोटो ओळी

२४०९२०२१-आयसीएच-०२

गावभागमधील महिलांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून विविध प्रश्नांचा भडीमार करत नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना घेराव घातला.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Women march on the provincial office to get grain on ration cards