शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय महिलाही सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:22 IST

शिवाजी पेठेत मेळावा : लढा यशस्वी करण्याचा निर्धार

कोल्हापूर : एखाद्या लढ्यात महिला सहभागी होतात, तेव्हा तो यशस्वी होतो असा अनुभव आहे. आपण साऱ्याजणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे म्हणून सुरू असलेल्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करूया, असा निर्धार मंगळवारी शिवाजी पेठेत झालेल्या सर्वपक्षीय महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात हा मेळावा पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, माजी नगरसेविका, माजी महापौर सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असल्याने या लढ्यात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.प्रारंभी भाजपच्या गायत्री राऊत यांनी शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न काय आहे, तो कधीपासून चर्चेत आहे, राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे, सरकारने त्याला कशी बगल दिली आहे यासंबंधीचा ऊहापोह केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांनी, शहराची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास करण्यावर मर्यादा आल्याचे सांगितले.माजी महापौर सई खराडे यांनी हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षे सुटलेला नाही. २००६ मध्ये हद्दवाढ झाली असती. परंतु त्यावेळी काही जणांनी खो घातला. शहरात येणाऱ्या ग्रामीण जनतेवर महापालिकेने पुढील काही वर्षे प्राॅपर्टी टॅक्स लावायचा नाही, असेही ठरले होते, असे खराडे म्हणाल्या.महिला कार्यकर्त्यांनी या लढ्यात भाग घेतला पाहिजे, असे आवाहन माजी महापौर हसिना फरास यांनी केले. महिला एकत्र येतात तेव्हा लढा यशस्वी होतो, तेव्हा हद्दवाढीचा लढा यशस्वी करूया, असे माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या.विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैशाली महाडिक, सिद्धी रांगणेकर, संगीता खाडे यांचीही भाषणे झाली. झहिदा मुजावर, माधुरी नकाते, माधवी गवंडी, श्वेता कुलकर्णी, रेखा आवळे, धनश्री तोडकर, पूजा भोर, मंगलताई साळोखे उपस्थित होत्या.राजकीय इच्छाशक्तीचा अभावराजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हद्दवाढीचा प्रश्न रेंगाळला आहे. म्हणूनच आता नेते मंडळींना हद्दवाढ का नको ते सांगा अशी विचारणा करण्याची वेळ आली असल्याचे पद्मजा तिवले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला