स्त्रियांना देवीची नको, व्यक्तीची वागणूक द्या

By Admin | Updated: October 23, 2014 00:10 IST2014-10-22T21:16:35+5:302014-10-23T00:10:42+5:30

कांचनताई परुळेकर : पेठवडगावमध्ये महिला राष्ट्रीय परिषद

Women do not want to be goddess, behave in a person | स्त्रियांना देवीची नको, व्यक्तीची वागणूक द्या

स्त्रियांना देवीची नको, व्यक्तीची वागणूक द्या

पेठवडगाव : पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बदल करावयाचा असेल, तर स्त्री सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून करावी. स्त्रीला देवीऐवजी व्यक्तीची वागणूक द्यावी, असे प्रतिपादन स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचनताई परुळेकर यांनी केले.येथील विजयसिंह यादव महाविद्यालयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग, कल्याणी सखी मंच यांच्या सहकार्याने ‘स्त्री सबलीकरणाचे बदलते टप्पे’ या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली. त्यावेळी परुळेकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा व नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या.
परुळेकर म्हणाल्या, स्त्रियांच्या विषयावर केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. या चळवळीत पुढाकार घेऊन कार्य करणारे कार्यकर्ते तयार होणे गरजेचे आहे.माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, महिलांना स्वत:च्या उत्पन्नाचा विनियोग स्वत: करण्याचा अधिकार मिळावा, तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होईल. विद्या पोळ म्हणाल्या, मूल्याधिष्ठित शिक्षणातून स्त्री सक्षमीकरणाची गरज आहे. प्रत्येक प्राध्यापकाने किमान एका गरीब मुलीचा
शैक्षणिक खर्च करून जबाबदारी घ्यावी. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल, तरच कार्यशाळेचा हेतू सफल होईल.
प्राचार्य मधुकर बाचूळकर यांनी प्रास्ताविक केले. सचिन पवार यांनी आभार मानले.

पेठवडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेमध्ये कांचनताई परुळेकर यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा विद्या पोळ. शेजारी गुलाबराव पोळ, प्राचार्य मधुकर बाचूळकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Women do not want to be goddess, behave in a person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.