परीक्षा घेऊन स्त्री पुजारी नेमावा

By Admin | Updated: April 20, 2016 00:51 IST2016-04-19T23:39:09+5:302016-04-20T00:51:43+5:30

अंबाबाई मंदिर : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मागणी

The woman priest took the exam and took it | परीक्षा घेऊन स्त्री पुजारी नेमावा

परीक्षा घेऊन स्त्री पुजारी नेमावा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रशासनाने परीक्षा घेऊन स्त्री पुजारी नेमावा, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली असल्याची माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली.
करवीरनिवासिनी अंबाबाई देवी ही महालक्ष्मी नाही. ती विष्णुपत्नी नसून शिवपत्नी आहे, अशी भूमिका घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना जिवे मारण्याचे धमकी पत्र आले आहे. डॉ. देसाई यांच्यासोबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आहे. अंबाबाई मंदिरातील गैरप्रकारांबाबत ब्रिगेडने उपस्थित केलेल्या प्रश्नांची येथील पुजाऱ्यांनी उत्तरे द्यावीत. या पुजाऱ्यांना देवीचे स्वरूप बदलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हटवून त्यांच्या जागी प्रशासनाने परीक्षा घेऊन वेतनावर स्त्री पुजारी नेमावेत, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत आहोत. .

Web Title: The woman priest took the exam and took it