शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रायंडरमध्ये साडीचा पदर अडकून महिला ठार, कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 12:08 IST

मुलाचे लग्न पाहायचे राहून गेले, डोशाचे पीठ तयार करताना दुर्घटना

कोल्हापूर : डोशाचे पीठ तयार करताना ग्रायंडरमध्ये साडीचा पदर अडकून गळ्याला फास लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लता रत्नाकर रेवणकर (वय ४८, रा. खंडोबा तालमीजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना सोमवारी (दि. १६) रात्री साडेसातच्या सुमारास रेवणकर यांच्या घरात घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिर परिसरात जोतिबा रोडला रेवणकर यांचे साई डोसा सेंटर आहे. सोमवारी रात्री लता रेवणकर या घरातील ग्रायंडर मशीनवर डोशाचे पीठ तयार करीत होत्या. अचानक साडीचा पदर मशीनमध्ये अडकून त्या ओढल्या गेल्या. त्याचवेळी गळ्याला साडीचा फास लागून त्या कोसळल्या. आई फोन उचलत नसल्याने मुलाने हॉटेलमधून शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी रेवणकर यांच्या घरात जाऊन पाहिले असता, त्या निपचित पडल्याचे दिसले. याची माहिती मिळताच मुलगा रोहित घरी आला. सीपीआरमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच लता यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रेवणकर यांच्या पश्चात सासू, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.मुलाचे लग्न पाहायचे राहून गेलेलता रेवणकर यांच्या मुलाचा साखरपुडा झाला असून, दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. तत्पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खंडोबा तालीम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू