शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत जन्मली गोंडस परी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 12:30 IST

कोल्हापुरात शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक महिलेनं एका गोंडस परी जन्म दिला आहे. सध्या बाळ व आई दोघीही सुखरूप आहेत.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 27 -  कोल्हापुरात शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक महिलेने एका गोंडस परी जन्म दिला आहे. बाळ व आई दोघीही सुखरूप आहेत. डिलिव्हरी झाल्यानंतर आईचा जीव भांड्यात पडला.  हो... कारण वेळच तशी होती. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे गरोदर महिलेला जीवदान मिळाले आणि तिनं आपल्या परीलाही जन्म दिला.  

परीच्या जन्माची कहाणी !कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरचा वाघबीळ घाट ओलांडून थोडसं पन्हाळ्याच्या बाजूला सरकले की नागमोडी वळणाच्या वाघबीळ घाटाच्या अखेरच्या वळणावर, बांबरवाडी नावाचं छोटं गाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस. थंडगार वारा. त्यात मध्यरात्रीची वेळ अशातच बांबरवाडी गावच्या कोपऱ्यावर हॉटेलामध्ये आचाऱ्याचं काम करणाऱ्या संभाजी बडेच्या पत्नीला असह्य अशा प्रसव वेदना सुरू झाल्या. ओसाड- दुर्गम भागात रात्रीच्या वेळी आजूबाजूला दवाखान्याची कोणतीही सुविधा नाही. यावेळी कुणी तर पटकन वैद्यकीय मदतीसाठी फोनवरुन 108 क्रमांकावर संपर्क साधला  आणि पलीकडून 15 मिनिटांत पोहोचतो, असे उत्तर मिळालं.डॉ.अभिजित जाधव जोतिबाच्या डोंगरावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसोबत कर्तव्य बजावत होते. फोन आल्या आल्या त्यांनी रुग्णवाहिकेच्या आपल्या पथकाला सोबत घेऊन चालकाला रुग्णवाहिका बांबरवाडीच्या दिशेला घेण्यास सांगितले. सुमारे 10 ते 12 किलोमीटर  अंतर कापून अवघ्या 15 मिनिटांत ते संभाजी बडे राहत असलेल्या घरासमोर पोहोचले सुद्धा.

संभाजीची पत्नी साक्षी असह्य प्रसव वेदनांनी व्याकुळ झाली होती. तिच्यात त्राण उरला नव्हता. त्यामुळे डॉक्टर अभिजित जाधव यांनी रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. बरोबर रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी एका गोंडस परीने या रुग्णवाहिकेतच जन्म घेतला.  यावेळी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकातील सर्वांनी आनंद साजरा केला.  साक्षीने जन्म दिलेल्या गोंडस परीची नाळ कापण्यासाठी तिला पन्हाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. आईला पुढील उपचारासाठी तेथेच दाखल करण्यात आले. आता आई आणि तिची नुकतीच जन्मलेली परी सुखरूप आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शासनाने नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी दाखल केल्या आहेत. रस्त्यावरचे अपघात असोत अथवा तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज असो तुम्ही केवळ 108 क्रमांक फिरवला की तुमच्या दारातून रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका तज्ञ वैद्यकीय पथकासह लगेच हजर होते. तुमच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी जिवाचा आटापिटा करून सर्वजण कामाला लागतात. 

गेल्या तीन वर्षांपासून या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकाचे अहोरात्र, अविश्रांत 24 तास काम सुरू आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील हजारो रुग्णांना आणि कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील अपघातग्रस्तांना या रुग्णवाहिकेमूळे जीवदान मिळाले आहे, असे या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथक प्रमुख डॉ अभिजित जाधव अभिमानाने सांगतात.