मोपेड घसरुन पडल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:14+5:302021-07-19T04:16:14+5:30
कोल्हापूर : भरधाव मोपेड घसरुन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रेश्मा सचिन दिवटे ...

मोपेड घसरुन पडल्याने महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : भरधाव मोपेड घसरुन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रेश्मा सचिन दिवटे (वय ३७, रा. अहिल्याबाई होळकर नगर, म्हसोबा मंदिरनजीक, नाना पाटील नगर, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना क्रशर चौक ते देवकर पाणंद दरम्यान मत्स्यबीज केंद्रासमोर घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेश्मा दिवटे ह्या आपल्या मोपेडवरुन भरधाव वेगाने जात होत्या. त्यावेळी देवकर पाणंद पेट्रोल पंपानजीक मत्स्यबीज केंद्राजवळ त्यांची दुचाकी रस्त्यावर घसरल्याने त्या पडल्या. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी घडली. या अपघातात मोपेडचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.