विद्युत मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:49+5:302021-05-01T04:23:49+5:30

इचलकरंजी : जय भवानी मंडळ परिसरातील एका महिलेचा विद्युत मोटारीचा धक्का लागून मृत्यू झाला. सविता राजेंद्र पोसुगडे (वय ५५, ...

Woman dies after being hit by an electric car | विद्युत मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

विद्युत मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

इचलकरंजी : जय भवानी मंडळ परिसरातील एका महिलेचा विद्युत मोटारीचा धक्का लागून मृत्यू झाला. सविता राजेंद्र पोसुगडे (वय ५५, रा. शेळके गल्ली) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची वर्दी बाबूराव शंकर पोसुगडे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळच्या सुमारास परिसरात नळास पाणी आले होते. त्यावेळी सविता या विद्युत मोटार लावून पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी मोटारीला जोडलेले पाण्याचे पाइप निघाले. ते जोडत असताना त्यांना धक्का लागला. तत्काळ त्यांना एका खासगी रुग्णालयात, नंतर आयजीएम रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सविता यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.

फोटो ओळी

३००४२०२१-आयसीएच-०२ - सविता पोसुगडे

Web Title: Woman dies after being hit by an electric car