वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:16+5:302021-09-25T04:26:16+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अविक कॉम्प्लेक्स शाहूपुरी येथे मसाज पार्लरच्या नावाखाली भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये ...

वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेला अटक
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अविक कॉम्प्लेक्स शाहूपुरी येथे मसाज पार्लरच्या नावाखाली भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी एका महिलेविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले व त्यांच्या अंमलदारामार्फत माहिती घेऊन या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा एजंट महिला व चार पीडित महिला मिळून आल्या. आरोपी महिलेवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलमान्वे तसेच भा.दं.वि.स. कलम. ३७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेला ताब्यात घेऊन ८५०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार पीडित महिलांची सुटका केली आहे.